नाशिक , प्रतिनिधि , अमन शेख ,
शिवसेना ठाकरे गटातील उपनेते पदावरून हकालपट्टी झालेले नाशिकमधील संशयित सुनील बागुल यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सोमवारी (दि. ७) होणारी सुनावणी न्यायाधीश रजेवर असल्यामुळे टळली. दरम्यान, आता बागुल यांच्या जामीन अर्जावर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे बागुल यांचा भाजप प्रवेश आणखीनच लांबणीवर पडला असून मामा राजवाडेसह इतरांचा शोध सुरु असल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले आहे.
हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता गजू घोडके याच्या काठेगल्लीतील घरात जबरीने शिरून मारहाण करत जीवे मारण्याच्या प्रयत्नासह चोरी केल्याच्या आरोपानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात बागूल यांच्यासह माजी महानगरप्रमुख संशयित मामा राजवाडे व इतरांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी संर्शायत सुनील बागुल यांच्याकडून काही दिवसांपूर्वीच जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला.
दरम्यान, या अर्जावर शनिवारी (दि. ५) निर्णय होऊ शकला नाही. तर, सोमवारी न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी होणार होती; मात्र, न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ही सुनावणी टळली. मामा राजवाडे यांनी बागुल यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा दावा फिर्यादीत नमूद असून राजवाडे, देशमुख यांच्यासह उर्वरित संशयितानी अटकपूर्व जामीन अर्ज केला नसल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले आहे.
Social Plugin