प्रतिनिधी --संजय भरदुक मंगरुळपीर
आज दि ८ जुलै रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार महसूल मंडळांतर्गत असलेल्या पिंपरी(अवगण),पिंपरी(खु),कंझरा,गोगरी,हिंरंगी,खेर्डा या भागासह अतिवृष्टीमुळे पेरलेले बियाणे निघालेच नाही संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांनी मंगरूळपीर तहसीलदार कु शितल बंडगर मॅडम यांना पाहणी करण्यासाठी सांगितले पाहणी दौरा करतेवेळी मा.आमदार यांचे स्वीय सहायक सिद्धेश देशमुख,भाजपा शेतकरी नेते विनोद पाटील जाधव,मंगरूळनाथ भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे,तालुका उपाध्यक्ष अनिल काटकर,किशोर इंगोले,किशोर मूखमाले,नंदकिशोर पावसे,गजानन अवगण,कैलास पाटील,डीगंबर राऊत सह शेतकरी हजर होते.प्रसंगी तहसीलदार मॅडम यांनी ज्या शेतकऱ्यांची पेरणी बुडाली त्यांनी संबंधित तलाठ्याकडे आपली तक्रार नोंदवावी तेव्हा पुढील आदेश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मंडळ अधिकारी व तलाठी पाहणी करतील.
Social Plugin