Ticker

6/recent/ticker-posts

कोटेकल्लूर गावामधील रस्ता बनला मृत्यूचा सापळा सांगा अम्ही शाळेत जायाच तरी कस



देगलूर- प्रतिनिधी- जावेद अहेमद

देगलूर तालुक्यातील कोटेकल्लुर येथे पावसाळा सुरू होताच मुख्य रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. चिखल, खड्डे आणि पाणी साचल्याने हा रस्ता गावकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असूनही प्रशासनाचे लक्ष नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.रस्त्यावर मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची ससेहोलपट होत आहे. शाळेत जाणारी लहान मुले चिखलातून वाट काढताना दिसत आहेत. त्यांचे कपडे, वह्या, बूट सगळं भिजून खराब होत आहे. रुग्णवाहिका या रस्त्याने जाताना अडकते, ही अजून चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे कोटेकलुर गाव स्थानिक आमदारांचं या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसील कार्यालय, पंचायत समितीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही.गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात, पावसाळ्यात आम्ही असंच तडफडत जगतो. निवडणुकीच्या वेळी नेते रस्त्यावर फिरतात, पण

आता सगळे गायब झालेत. दरवर्षी आम्ही हेच हाल सहन करतो. निवडणुकीपूर्वी आश्वासनं देणारे पुढारी नंतर चार वर्षे दिसतच नाहीत, या रस्त्याचा वापर फक्त कोटेकलुरकरच नाही तर आसपासचे शेतकरीही करत असतात. त्यांना शेतीसाठी खते, बियाणं आणताना मोठा त्रास होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणंही कठीण आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था व्हावी, खासदार, आमदारांनी गावाला भेट द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.