300 अपदा मित्रांसह रबरी बोट आदी 245 साहित्य उपलब्ध
अलिबाग(रत्नाकर पाटील):-
रायगड जिल्ह्यामध्ये जूलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. दरवर्षी या कालावधीत मोठी वित्तहानीबरोबरच जिवीतहानी होते. जूलै महिना उजाडाला असून या महिन्यात अतिवृष्टी होण्याची नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्तीपासून बचाव करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. अपदा मित्रांसह अलर्ट सिस्टीम, सेटेलाईट, रबर बोट अशा अनेक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
जूलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा पाऊस सुरूच राहतो. या पावसामध्ये महाडसह पोलादपूर, खालापूरमधील इरसालवाडी अशा अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या दरडीमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. अतिवृष्टीमुळे रोहामधील कुंडलिका नदी, सावित्री नदी अशा अनेक प्रमुख नद्यांसह अन्य नद्या पाण्याने तुडूंब भरतात. अलिबाग तालुक्यातील रामराज नदीसह गावामध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. महाड गावदेखील पाण्याखाली जातो.जूलै महिन्यामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्यापासून पुर येण्याची परंपरा कायमच आहे. या कालावधीत सर्वच यंत्रणाची धावाधाव सुरू होते. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करताना तारेवरची कसरत होते. जूलै महिना उजाडला असून या महिन्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात 392 दरडग्रस्त आणि 136 पुरग्रस्त गावे आहेत. अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त दरडग्रस्त भागांमध्ये आपदा मित्रांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात 300 अपदा मित्र आहेत. पुराच्या वेळी पाण्यात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाटी रबरी बोटीची व्यवस्था केली आहे. जिल्हयात 14 बोटी आहेत. दरडीसह पुरग्रस्त गावांतील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यासाठी 91 अलर्ट सिस्टीम बसविण्यात आले आहेत. वातावरणातील बदलत्या हवामानाची माहिती उपलब्ध होण्यासाठी 60 स्वयंचलित हवामान केंद्र, पर्जन्यमापक यंत्र 60, सेटेलाईट फोन 20 आहेत.
Social Plugin