पालघर (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
पालघर तालुक्यात जलसार ते महारंबळपाडा येथे काही महिन्यापूर्वी चालू झालेल्या रोरो सेवेची तिकीट ही चक्क इंग्रजीत छापली गेलेली आहेत. सदर रोरोसेवा ही महाराष्ट्रात असून ती पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात आहे.राज्यभाषेचा वापर हा अनिवार्य असताना .तिकिटावर कुठेच मराठी दिसत नाही. ह्या मुळे महाराष्ट्रातच*मराठी* ची गळचेपी होत आहे काय?
ही प्रश्न उद्भवत आहे.मराठी साठी सर्वच जण आग्रही असताना ग्रामीण भागात मराठी ऐवजी इंग्रजीत तिकीट वितरित करणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान आहे. रोरो सेवा देणारे आणि राजकीय तसेच सामाजिक लोकांनी ह्या कडे लक्ष देऊन तिकीट मायमराठीत वितरीत करावी .अशी मागणी होत आहे. त्या साठी पालघर मधील वकील प्रथमेश प्रभुतोंडवलकर ह्यांनी विनंती अर्ज सादर केला आहे
Social Plugin