राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे संञा झाडांना भरपूर प्रमाणात बहार आला परंतु त्या नंतर १५-२० दिवसाचा खंड पडला.व तापमानात वाढ होऊन ४०डिगरी सेल्सिअस वर पारा गेला.आलेला मुर्ग बहार गडून पडला.
दिग्रस तालुक्यात मोठ्या प्रमाणात संञ्याचे पिक घेतले जाते.कलगाव;डेहणी,कांदळी, आडगाव-वडगाव,तुपटाकळी, बेलूरा,महागाव, चिंचपात्र, महागाव, साखरा,लाख,व इतर गावात मोठ्या प्रमाणावर संञा बागा आहेत.संञाचे पिक निसर्गावर अवलंबून असते संञा झाडांना उन्हाळ्यात तान दिल्या नंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगले तीन-चार पाणी आल्यास संत्रा झाडांना बाहार येण्यास सुरुवात होते.
वातावरण थंड राहिल्यास फळधारणा चांगल्या प्रकारे होते. उलट उष्ण वातावरण असल्यास संत्रा ची फळ गळतात यावर्षी वातावरण दमट झाल्याने आलेला बाहर पूर्णता गळाला.बाहर टिकवण्यासाठी शेतकर्यांनी दोन -तिन फवारण्या केल्या त्यावर मोठा खर्च झाला.परंतू तोंडाचे घास निसर्गाने हिरावल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानी तहसीलदार मयुर राऊत व तालुका कृषी अधिकारी आडे मॅडम यांच्या मार्फत शासनाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून मदत मिळावी म्हणून निवेदन दिले. यावेळी मिलिंद तुंडलवार डेहणी, फारुक अहेमद, प्रमोद बनगीणवार, सुभाष काटेकर, संतोष अटल, शारीरिक सौदागर इतर शेतकरी उपस्थित होते.
Social Plugin