Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समिती सभापती ते थेट ऑटो चालक !

 


बाळापूर प्रतिनिधी : राजेश दामोदर

       नामदेव डोलारे यांचा असाही प्रवास २ वर्ष होते पंचायत समिती सभापती ऑटो चालवून ओढतात संसाराचा गाढा विजय मेहरे... 

गायगावः ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपद भूषविणारे पद गेल्यानंतर चारचाकी वाहनात फिरतात. मात्र पंचायत समिती सभापतीपद भूषविणारे नामदेव डोलारे यांच्या आयुष्याचा प्रवास उलट दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सभापती पदावरून थेट ते सध्या ऑटो चालवून आपला संसाराचा गाढा ओढत आहेत. सन १९९७ ते १९९९ मध्ये उमरा येथील नामदेव गंगू डोलारे हे पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर आरक्षणाचा फायदा त्यांना होत त्यांची निवड थेट पातूर पंचायत समिती सभापती पदावर झाली. डोलारे यांचे शिक्षण पहिल्या वर्गात फक्त १० दिवस एवढे झालेले होते. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून डोलारे पती-पत्नी आपला संसार पुढे नेत होते. सभापती झाल्यामुळे त्यांचे आयुष्यात पाहिजे तो बदल व्हायला पाहिजे पण तो झाला नाही. शिक्षणाचा अभाव व साधेपणामुळे डोलारे यांच्या पदरात २ वर्षात फक्त सभापती या पदाव्यतिरिक्त काही पडले नाही. 

दररोज नागरिकांच्या समस्या सोडविण्यात डोलारे मग्न झाले तर त्यांच्या पत्नींना सभापतीची बायको असल्यामुळे शेतात काम मिळणे कठीण होत गेले. २ वर्षानंतर सभापती पदाचा कार्यकाळ संपल्यावर गावात काम मिळेना म्हणून नामदेव डोलारे यांनी गाव सोडत अकोला शहर जवळ केले. गावात सभापती तर अकोल्यात ऑटोचालक, नामदेव डोलारे यांचाहा आयुष्याचा उलटा प्रवास अनेक संकटे व दुःखाने भरलेला आहे. पण पत्नी सिंधूयांनीत्यांना अशा दिवसात साथ दिली आहे. अकोल्यात डोलारे ऑटो मी सभापती असताना अनेकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मेहनत घेतली. शिफारस केली पण अकोल्यात आज माझ्याच डोक्यावर हक्काचे छत नसून मी भाड्याच्या घरात राहतो. तरीदेखील हलाखीच्या अशा परीस्थितीत मी समाधानी आहे. - नामदेव गंगू डोलारे, माजी सभापती पं. स. पातूर चालवून आपला संसाराचा गाढा ओढत आहेत.