Ticker

6/recent/ticker-posts

समता परिषदेच्या प्रदेश चिटणीस पदी प्रा गाभणे



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

     मालेगाव ता 20 -अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश चिटणीस पदी प्रा अरविंद गाभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची नियुक्ती समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना छगनराव भुजबळ यांनी केली आहे प्रा गाभणे यांनी समता परिषदेचे मालेगाव तालुका अध्यक्ष, वाशिम जिल्हा अध्यक्ष आणि समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती आता समता परिषदेच्या प्रदेश चिटणीस पदी करण्यात आली आहे त्यांनी नियुक्ती चे श्रेय ना छगनराव भुजबळ, समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ, पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ यांना दिले आहे 

समता परिषदेचे संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार प्रा गाभणे यांनी व्यक्त केला आहे त्यांचे नियुक्ती बद्दल समता परिषदेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष संतोष गोमाशे, यवतमाळ पूर्व जिल्हा अध्यक्ष विनोद इंगळे, यवतमाळ पश्चिम जिल्हा अध्यक्ष राजेंद्र घाटे, अमरावती पश्चिम जिल्हा अध्यक्ष विपुल नाथे, बुलढाणा (घाटावरील) जिल्हा अध्यक्ष संतोष खान्देभराड अकोला महानगर कार्याध्यक्ष उमेश मसने,दिपक निमकर्डे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष सेवाराम आडे, यशवंत हिवराळे, विलासराव रोकडे,जिल्हा सचिव विठ्ठल भागवत, मालेगाव तालुका अध्यक्ष जावेद भवानिवाले,कपिल भालेराव, माजी सैनिक अशोकरावं घुगे कारंजा तालुका अध्यक्ष वसंतराव मारोटकार, मानोरा तालुका अध्यक्ष धनराज दिघडे, मंगरुळापीर तालुका अध्यक्ष तुषार जवके, चंद्रकांत गायकवाड आदिनी अभिनंदन केले आहे