Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे स्टेशनंचे काम एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा "नंदिग्राम "व "साप्ताहिक "रेल्वे गाड्याला मुकुटबण ला "थांबा" देणार कधी



प्रतिनिधी :-सागर इंगोले 

तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे पंधरा ते सोळा हजार लोकसंख्येचे हॆ गाव या परिसरातील मोठ्या संख्येने व्यापारी व नागरिक लांब प्रवास करतात. येथील परिसरात सिमेंट कंपन्या, कोळसा खादानी, व चुना फॅक्टरी सारखे, अनेक विविध्द उदयोग धंदे येथे आहे. रेल्वे थांबा नसाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, आजारी रुग्णा्नां चांगले उपचार घेण्याच्या येथे सोई सुविधा कमी असल्यामुळे मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे नंदिग्राम व साप्ताहिक रेल्वे गाड्याला थांबा द्यावा यासाठी विविध राजकीय पक्ष्याच्या, व विविध संघटनाणी  रेल रोको आंदोलन चे अनेक निवेदने रेल्वे विभागाला देन्यात आले व रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांना या बाबत समस्या मांडण्यात आल्या 

परंतु आजपर्यंन्त यावर कोणताही तोडगा निघतांना दिसत नसल्याने येथील सुरेंद्र गेडाम यांनी पुढाकार घेत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे  सर्वपक्षीय बैठक बोलावून त्या बैठकीमध्ये यावर काय केले म्हणजे येथे आपल्या रेल्वे स्टेशनं ला रेल्वे थांबा मीळेल यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी कमेटी नेमण्यात आली..व याचा पाठपुरावा कसा करायचा यावर चर्चा करण्यात आली. यावेळी या सभेला सर्व पक्षाचे प्रतिनिधी व झरी तालुक्यातील नागरिक उपस्तित होते.सभेला प्रकाश म्यॅकलवार, नेताजी पारखी, चक्रधर तीर्थगिरीकर, संदीप विचू, सुरेंद्र गेडाम, मुन्ना अक्केवार पत्रकार संजय अकिंवार, यांनी या सभेला मार्गदर्शन केले.

 सभेमध्ये रेल्वे थांबा झाला पाहिजे म्हणून रेल्वे थांबा संघर्ष समिती मुकुटबन असे या समितीला नावं देण्यात आले. व या सभेला अभिनव रेड्डी येगुरवार, विलास चितलावार,केशव नखले, सुनील ढाले, प्रकाश खीरडकर, सागर इंगोले, संदीप धोटे, पत्रकार रफिक कनोजे,विपीन वडके,गजानन मुत्यलवार,गजेंद्र दरबेश्वर, हरिश्चन्द्र बल्की, हनुमंत कुडमिलवार, महेश मेश्रम, प्रियल पथlडे, अमित मुके,, आदी सर्व उपस्तित होते