Ticker

6/recent/ticker-posts

अंबड शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएल च्या नेटवर्क चे वाजले तीन तेरा




अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ


अंबड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे ४० टॉवर आहे.परंतु सुरळीत मोबाईल सेवा मिळत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत नागरीकांनी  बीएसएनएलवर विश्वास दाखवला परंतु शहरासह ग्रामीण भागात मागील दोन दिवस बीएसएनएलची बत्ती गुल झाली होती.नेटवर्क गायब असल्याने लोकांचा डाटा खराब झाला असून ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलची मोठ्या प्रमाणात नेटवर्क सेवा विस्कळित होत असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेक ठिकाणी बीएसएनएल टॉवरची रेंज पूर्णपणे गायब झाली.

असून यामुळे कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे अशक्य झाले आहे.या समस्येमुळे ग्रामीण भागातील ग्राहक विशेषतःत्रस्त आहेत,कारण त्यांच्यासाठी बीएसएनएल हा अनेकदा एकमेव उपलब्ध पर्याय असतो. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणापासून ते व्यावसायिकांच्या दैनंदिन कामांपर्यंत,सर्वच गोष्टींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे.तांत्रिक बिघाड की देखभालीचा अभाव ? याबाबत बीएसएनएलकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.मात्र या सततच्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.यावर कायमची उपाययोजना करावी,अशी अंबड शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकाकडून मागणी केली जात आहे...