Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूर हेमाडपंती महादेव मंदिर परिसरात पावसासाठी महाप्रसाद



●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर

 

आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथे निळकंठेश्वर हेमाडपंती महादेव मंदिर परिसरात पाऊस वेळेवर बरसण्यासाठी मंगळवार दि.२२ जुलै रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.परंतु,आदल्या दिवशी सोमवार दि.२१ रोजी सायंकाळी ४ वाजता एक तास पाऊस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.या थोड्याफार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले.

तब्बल पंधरा ते अठरा दिवसांपासून आदमपूर व इतर परिसरात पावसाने दडी मारलेली होती.आभाळ दाटून येत असे माञ,वार्‍याने पुन्हा ते निरभ्र होत असे.पावसाचे संकेत धुळीस मिळत होते.खरीप पिकांनी माना खाली टाकलेल्या होत्या.प्रचंड प्रमाणात वातावरणात कडक उन्हामुळे पावसाळ्यात उकाडा माणसे अनुभवत होती.त्यामुळे शेतकरी प्रसंगी चिंताग्रस्त असल्याचे चिञ होते.सोमवारी गावातील युवक माधव राहिरे व गावकरी यांनी दि.२२ रोजी महाप्रसाद वाटप करण्याचे दुपारी जाहीर केले.सायंकाळी त्याच दिवशी ५ वाजता एक तास पावसाचे आगमन झाले.तरीपण महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.त्यासाठी हौशी मिञ व इतर व्यावसायिक गावकरी यांच्यावतीने पट्टी गोळा करीत सदरील भंडारा यशस्वी करण्यात आला.