देगलूर- प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद मंडळ अंतर्गत सावरमाळ सज्जाचे ग्राम महसुल अधिकारी श्री औदुंबर हनमंत वाडीकर यांची तालुका शाखा मुखेड च्या तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे मा जिल्हा संघटक श्री. रातोळीकर साहेब यांच्या उपस्थितीत व सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना मुखेड शाखेची तालुका संघटना कार्यकारनी पुढीलप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष औदुंबर वाडीकर उपाध्यक्ष - श्रीमती कुणे मॅडम, सचिव श्री सतिश देशमुख ,सहसचिव-श्री.पी.एस. शिंदे ,कोषाध्यक्ष श्री सुरेश मैड,कार्याध्यक्ष श्री व्ही एल दुग्मवार ,प्रसिद्धी प्रमुख श्री के.एम कोंडलवाड ,संघटक . ईरफान सय्यद, महीला प्रतिनिधी- श्रीमती तोरणे मॅडम, श्रीमती जमादार मॅडम ,सल्लागार - श्री कोणीले सर ,मं अधिकारी जाहर ,संदीप फड, मं अधिकारी जांब,ईश्वर मंडगीलवार, मं अधिकारी अंबुलगा गरुडकर सर, में अधिकारी मुखेड, माने त्रिशीला में अधिकारी चांडोळा, जांभळे संजय म.अधिकारी बाराहाळी श्री माधव पांचाळ मं.अधिकारी मुक्रमाबाद. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेची पुढील ५ वर्षासाठी नुतन पदाधिकारी कार्यकारणीची निवड करण्यात आली. या निवडीबध्दल सर्व तालुक्यातून गावातील शेतकरी व राजकीय पक्ष, व्यापारी, पत्रकार बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Social Plugin