टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. येथील शहीद जवान सतीश पेहरे यांच्या स्मारकावर ५ व्या स्मृती दिनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी दि.१४ रोजी सकाळी ११ वाजता वीर माता, वीर पिता,वीर पत्नी व त्यांचे कुटुंबीया समवेत तहसील कार्यालयाच्या वतीने शिवाजी लहाने, व पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश जाधव व माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख कुंडलिक पा. मुठ्ठे यांनी स्मारकावर पुष्प वाहून आदरांजली वाहत, "अमर रहे,अमर रहे, "शहीद जवान, अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी शहीद झालेले सैनिक सतीश पेहरे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये जाफराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश जाधव, पोलिस उपनिरीक्षक राजधर पठाडे, सहाय्यक पोलीस उपनिरक्षक श्री मोरे, हे.कॉ. महेश वैद्य पो.कॉ.राम मोरे, तहसील कार्यालय चे तलाठी शिवाजी काळे,वीर पिता सुरेश पेहरे, वीर माता अलकाबाई पेहरे,वीर पत्नी जया पेहरे,वीर पिता भीमराव नागरे माजी सैनिक शंकर ताठे, रमेश खरात विठ्ठल साळवे, त्र्यंबक साळवे अरुण साळवे काकडे दुर्योधन साळवे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.तर शेवटी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कुंडलिक मुठ्ठे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानून, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
Social Plugin