शेतकर्यांनी मानले अध्यक्षांचे आभार
राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस
कलगाव सोसायटीला तिनं गावाचे शेतकरी जोडले आहेत. ३० मार्च पर्यंत शेतकर्यांनी घेतलेले पिक कर्ज भरले होते. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नव्हते संस्थेचा सचिव अंकेक्षण अहवालात आर्थिक आफरातरीचा दोशी आढळल्याने त्याला ५ मे रोजीच निलंबित करण्यात आले होते. नवीन सचिवाने पदभार घेत. कागदाची पूर्तता करून शुक्रवार ३ जूनला बँकेला पेमेंट शीट सादर केली.व बँकेने पिक कर्ज वाटपास सुरुवात केली. सह (६) सोसायटीचे पदभार असलेले सचिव डाखोरे बँकेच्या अंकेक्षण अहवालात आर्थिक दोषी आढळल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले होते.
शेती पेरणीची वेळ येऊन ही पिक कर्ज मिळत नसल्याने लांबणीवर पडत असलेली पेरणी काहीणी उसनवारी तर काहींनी सावकारी काढून पेरणी केली.परंतू ते फेडायचे कसे प्रश्न पडला होता. सचिवावर असलेली अखेर शिल्लक रक्कम भरल्या शिवाय नवीन सचिवांला पदभार देता येत नसल्याने अध्यक्ष, संचालक व काही शेतकर्यांनी मिळून सचिवाला उसनवारी म्हणून देऊन आलेली वेळ काढली या सह अनेक अडचणी वर मात करत अध्यक्ष मोहसीन अहेमद सचिव विनोद राठोड,संचालक रामेश्वर राऊत, फारुक अहेमद,गणेश पुसदकर,अतीक सौदागर, जगदीश राठोड सह इतर संचालकानी परिश्रम घेतले.
("मला खूप अडचणीच्या वेळी पीक कर्ज मिळाले फारुक भाई यांच्या परिश्रमाने साकार झाले."-रामहारी देवसींग पवार.. शेतकरी )
Social Plugin