बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे उत्खनन व चोरटी वाहतूक होत असल्याचे समाज माध्यमातून सातत्याने ओरड होत असतानाही स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत नसल्याने अखेर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने नरंगल ते खानापूर, देगलूर मार्गावर वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर व वाळू जप्त केली आहे. यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक ३४५/२०२३ दाखल केला आहे. या प्रकरणात ६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे करीत आहेत.
Social Plugin