Ticker

6/recent/ticker-posts

सर्व समाज घटकांना सोबत घेऊन समता परिषदेची बांधणी करा - समीर भुजबळ



 *समता परिषदेची विभागीय बैठक*


मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

                      

  मालेगाव/वाशिम ता 7- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देश पातळीवर ओबीसी अल्पसंख्यांक मागासवर्गीय यांच्यासाठी कार्य करीत आहे त्यामुळे या संघटनेची बांधणी करत असताना सर्व समाज घटकाना समाविष्ट करावे असे माजी खासदार तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी केले ते ता 6 जुलै रोजी यवतमाळ येथिल विश्रामगृहामध्ये अमरावती अकोला यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या संवाद बैठकीमध्ये बोलत होते अशी माहिती समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी दिली माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की समता परिषदेने मंडल आयोगाची अंमलबजावणी असेल किंवा ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवणे असेल ओबीसी चे हक्क कायम राखण्याचे काम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनात करीत आहे 

ओबीसीच्या हक्कासाठी 18 पगड जातींना सोबत घेऊन समता परिषदेची बांधणी करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले या बैठकीला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ,प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष ऍड राजेंद्र महाडोळे,प्रदेश संघटक रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक डॉ नागेश गवळी, प्रा संतोष विरकर पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे, विभागीय संघटक गजानन इंगळे विभागीय प्रसिद्धी प्रमुख ऍड प्रभाकर वानखेडे, ऍड बाबूराव बेलसरे यवतमाळ पूर्व जिल्हा अध्यक्ष विनोद इंगळे यवतमाळ पश्चिम जिल्हा अध्यक्ष राजेंद्र घाटे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सुनयना येवतकर ॲड बाबुराव बेलसरे अमरावती जिल्हा अध्यक्ष विपुल नाथे, नंदकिशोर लेकुरवाळे महानगर अध्यक्ष अशोकराव दहिकर महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा कविता लांडे महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा ज्योती बाविसकर अकोला जिल्हा अध्यक्ष गजानन म्हैसने महानगर अध्यक्ष श्रीराम पालकर कार्याध्यक्ष उमेश मसने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौं मायाताई इरतकर, मालेगाव तालुका अध्यक्ष जावेद भवानिवाले, महिला आघाडी च्या तालुका अध्यक्षा सौं निता भालेराव आदी उपस्थित होते