बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सावर्डे येथील कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य संजय देसाई या ठिकाणी कार्यरत असलेले व मूळचे बूधचे आणि श्री नागनाथ विद्यामंदिर बुध चे माजी विद्यार्थी असून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेला मायक्रोसोप भेट दिला आहे . या मायक्रोसोपचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्लाइडस पाहण्यासाठी निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .यावेळेस देसाई सरांची कन्या डॉ . क्षितिजा देसाई यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अशा आकांक्षा पूर्ण करू शकतात असे मत मांडले .विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे व नाना दडस , तानाजी पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले .
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी शालेय जीवनात मायक्रोसोप हाताळताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या तसेच या नवीन तंत्रज्ञानाचा मायक्रोसोप विद्यार्थ्यांना सहज अध्ययन अध्यापन प्रक्रियेत उपयोगी पडेल याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन देखील केले तसेच संजय देसाई यांनी जिल्हा परिषद शाळा व हायस्कूल यांना दिलेले योगदान खूप मोलाचे आहे असे मत मांडले . प्राचार्य संजय देसाई व क्षितीजा देसाई यांनी मायक्रोसोप प्राचार्य अंकुश भांगरे यांच्याकडे सुपूर्द केला त्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे व आभार तानाजी पाटील यांनी मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
Social Plugin