प्रतिनिधी कैलास घरत
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पेण तालुकाध्यक्ष पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांचा खारपाडा वनजमीन संघर्ष समितीच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न.. पत्रकार कैलासराजे घरत यांच्या पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक कार्याचा गुणगौरव..
आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी खारपाडा येथील वन जमीन संघर्ष समितीचे मुख्य संयोजक ॲड. मनोहर पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला वन जमीन संघर्ष समितीचे लढाऊ कार्यकर्ते श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत, आमच्या संघटनेचे खजिनदार श्री.रत्नाकर काशीराम घरत, अत्यंत लढाऊ आणि निर्भीड कार्यकर्ते श्री.संतोष रामचंद्र घरत, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.दत्तात्रेय जनार्दन घरत, श्री.हनुमान बाबू घरत, श्री.देविदास रामा घरत, श्री.बळीराम बाळकृष्ण पाटील, श्री.अविनाश धनाजी मोकल, श्री.प्रकाश धर्मा घरत, श्री.कमलाकर हासुराम घरत, श्री.तुळशीदास महादेव पाटील, श्री.रघुनाथ नारायण घरत, आण्णासाहेब श्री.कमलाकर बाबू घरत, आईसाहेब सौ.निर्मला कमलाकर घरत यांनी पुष्पगुच्छ देऊन पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पेण तालुकाध्यक्ष पत्रकार कैलासराजे कमलाकर घरत यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत यांनी पत्रकार कैलासराजे घरत अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभागी होऊन राबवित असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गडसंवर्धन कार्याचा आवर्जून उल्लेख केला आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. शेवटी पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी सर्वांचे आभार मानले आणि आपल्या सर्वांचे प्रेम, स्नेह, जिव्हाळा, सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद कायम लाभत राहो अशी आशा व्यक्त केली.
सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद!!





Social Plugin