●ग्रामीण प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
●मुखेड तालुक्यातील मौजे खरब खंडगावचे सुपुत्र व सध्या गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर विमलबाई सोपानराव कांबळे यांना राज्यपाल सी.व्ही.राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले.
नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जानेवारी २०२० पासून सेवा बजावत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक भास्कर कांबळे यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बद्दल महामहिम राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, भारत सरकार, यांनी २०२३ साली स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर केले होते. भारत सरकारकडून जाहीर झालेल्या पदकाचे वितरण मुंबई येथील राजभवनात मंगळवार दि.२९ जुलै रोजी राज्याचे विद्यमान राज्यपाल सी. व्ही.राधाकृष्णन यांच्या हस्ते सपोनि भास्कर कांबळे यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले.
सपोनि भास्कर कांबळे यांना यापूर्वी केंद्र सरकार कडून आंतरिक सेवा पदक, खडतर व विशेष सेवा पदक, तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे. भास्कर कांबळे यांनी हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन यश मिळवल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक, गावकरी व मित्र परिवाराकडून कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे मुखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Social Plugin