Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्राम पंचायत अधिकारी संघटना मालेगाव तर्फे विनोदजी खेडकर यांचे निरोप समारंभ संपन्न

 




मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले



मालेगाव:दि :16/07/2025 रोजी मालेगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष,कायद्याचे सखोल ज्ञान व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले गटविकास अधिकारी विनोदजी खेडकर यांना मालेगाव तालुका पंचायत समिती अंतर्गत कार्यमुक्त करून त्याची बदली अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे करण्यात आले असून मालेगाव येथे ते कार्यरत असताना त्यांनी केलेले कार्याची जाणीव व सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना मालेगाव यांच्याकडून त्याचे सत्कारमूर्ती म्हणून राष्ट्रीय महामार्ग 161नगरतास रोड स्थित असलेल्या कैथलंजिंद या हॉटेलवर सत्कारमूर्ती निरोप समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांना शाल. श्रीफळ.पुष्पगुच्छ. टोपी.व गजानन महाराजांची प्रतिमाअसलेली भेटवस्तू देऊन उपस्थित असलेल्या सर्व मंडळी कडून त्याचे सत्कार करण्यात आले. उपस्थित  श्री कंकाळ साहेब (गट विकास अधिकारी),प्रमोद लोखंडे (विस्तार अधिकारी,)यादवराव पळसकर (विस्तार अधिकारी) जि.कार्याध्यक्ष मा.भागवत भुरकाडे जि.सहसचिव मा.मोहन वानखेडे मा.विजय शिंदे उपाध्यक्ष मा.संतोष राठोड कार्याध्यक्ष
मा.कु.वनिता लांडगे महिला उपाध्यक्ष.रूख्मीना करवते.कोषाध्यक्ष.आनंता मुंढे.सहकार्याध्यक्ष,उध्दवजी गावंडे सहसचिव. गणेश आंधळे सह कोषाध्यक्ष.नंदु साळुंके,विनोद भुरकाडे.विजय घुगे, सरिताताई पांडे .एच.डी.लोखंडे,व्ही.जी. मारोडकर .राहुल खाडे,एस.जी. वैद्य,आर.वी.देशमुख, लताताई करवते,सुनिल घाटे,डि.एम. जमदाडे,एस.वी.भोंडणे
 यांच्या उपस्थितीत निरोप हे समारंभ संपन्न करण्यात आले.