*
अंबड तालुक्यातील शहागड येथे मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बसस्थानक परिसर,उड्डाणपूलाखालील भाग,जुने बसस्थानक,बाजार गल्ली,जुना पूल ते राष्ट्रीय महामार्ग ५२ पर्यंत ही मोकाट जनावरे बिनधास्तपणे फिरत आहेत.यामुळे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी चिंता शहागडकरांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या पेट्रोलिंग टीमने या जनावरांना रस्त्यावरून हटवावे,तसेच त्यांच्या मूळ मालकांना नोटिसा बजावून कारवाई करावी,अशी मागणी शहागडकरांनी केली आहे.जर मालकांनी ऐकले नाही,तर या जनावरांना शहागड ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकावे,असेही नागरिकांचे म्हणणे आहे.या मोकाट जनावरांमुळे शहागडमध्ये अनेक ठिकाणी शेण मुळे शहागडच्या जुन्या बसस्थानक परिसरात उकिरड्याची स्वरुप व घाण रस्त्यावर पसरवताना मोकाट जनावरा पासुन स्पष्टपणे दिसत आहेत.
आणि मूत्रविसर्जना मुळे दुर्गंधी पसरली आहे. गावातील अनेक उकिरड्यांवरील घाण,प्लास्टिक आणि पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरवल्या जात आहेत.यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याकडे शहागड ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन या जनावरांच्या मालकांना कायदेशीर नोटीस पाठवून खुलासा मागवावा,अन्यथा ही जनावरे कोंडवाड्यात टाकून दंड आकारणी करावी,अशी मागणी जोर धरत आहे.विस ते पंचवीस मोकाट जनावरे वाळकेश्वर शिवारात बंधाऱ्याजवळ शेती असून,या शेतात ऊस लागवड केली आहे.ही मोकाट जनावरे ऊस पिकाला लक्ष्य करून मोठे नुकसान करत आहेत.
दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतात घुसून लहान तुरीचे पीक आणि झाडांचे मोठे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरीही त्रस्त झाले आहेत.

Social Plugin