Ticker

6/recent/ticker-posts

सातारा कारागृहातील बंदयांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन सातारा कारागृहातील बंदयांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्नबिर संपन्न



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या माध्यमातून सातारा कारागृहातील बंदयांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाला . कारागृहातील बंदयांसाठी कायद्याचे मार्गदर्शन, त्यांच्या हक्क, अधिकार, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, प्ली बार्गेनिंग याची माहिती देण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण साताराचे अध्यक्ष, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या आदेशाने व सचिव, श्रीमती लीना बेदरकर यांच्या उपस्थितीत सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर कारागृहात घेण्यात आले. 

 कार्यक्रमांमध्ये कारागृहातील बंदयांना प्ली बार्गेनिंग या विषयावर श्रीमती काटकर अध्यक्ष बाज कल्याण समिती यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी कारागृहातील ज्या बंदयांच्या मुलांना बालगृहात ठेवायचे आहे, त्याबाबत माहिती दिली. तसेच शैक्षणिक व आर्थिक मदतीची देखील त्यांनी सर्व बंदयांना माहिती दिली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती नीना बेदरकर यांनी बंदयांना मार्गदर्शन करून जामीन झाले  परंतु जामिनची पूर्तता केली नाही, या बंधना वकील नाही असे बंदी या सर्वांची माहिती घेऊन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत वकील देऊन ते वकील बंदयांसाठी न्यायालयात मोफत केस लढतात याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमास सचिव तथा न्यायाधीश निना बेदरकर, श्रीमती काटकर, श्रीमती देशमुख, वकील श्रीमती सुचिता पाटील, वकील आशिष राठोड, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार सुदाम बर्डे, हवालदार राजेंद्र शिंदे, हवालदार अहमद संदे, शिपाई यशवंत पाटील, योगेश कोरडे, सागर देवकर, तानाजी बुडगे, संदीप जाधव, किरण यादव, लता काळकुटे, अश्विनी पुजारी, काजल सायमोते, रूपाली नलवडे, सुनिता बारावकर इत्यादी उपस्थित होते.