Ticker

6/recent/ticker-posts

येलवाडी गावच्या उपसरपंच पदी विक्रम बोत्रे यांची तिसर्‍यांदा बिनविरोध निवड



येलवाडी प्रतिंनिधी @ समाधान भुसारे

येलवाडी– तीर्थक्षेत्र येलवाडी गावच्या उपसरपंचपदी विक्रम दिलीप बोत्रे यांची तिसर्‍यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यलयात ग्रामसेविका पूनम शेवाळे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

उपसरपंच पदासाठी विक्रम बोत्रे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच आणि खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजित गाडे यांनी घोषित केले. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश बोत्रे यांनी त्यांच्या पुढील कार्यास सदिच्छा दिल्या आहेत.

यावेळी उपस्थित माजी उपरपंच सुधीर गाडे, प्रशांत गाडे, सदस्य गोवर्धन बोत्रे, प्रदीप गायकवाड, सदस्या उर्मिला गायकवाड, सुजाता गाडे, मनीषा चौधरी यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मा.सरपंच अशोक बोत्रे, सागर गाडे, संगीता गाडे, तुषार गाडे,बाजीराव गायकवाड, सचिन गायकवाड, अमर कसबे, श्यामराव गायकवाड, आनंद गालफडे, गणेश गायकवाड, रितेश सरवदे, विनय सरवदे, संतोष सरवदे, किरण पटेल, विवेक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.