टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
२६ जुलै १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धात आपल्या देशाचा विजय झाला. या युद्धात लढलेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ तसेच शहीद झालेल्या भारतीय जवानांना अभिवादन करण्यासाठी हा कारगील विजय दिन सर्वत्र देशभरात साजरा केल्या जातो. शासकीय आय टी आय जाफ्राबाद येथे हा कारगील दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आज 26 जुलै २०२५ शनिवार रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जाफ्राबाद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शेख सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक सुरेश ठाले यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रथम प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून माजी सैनिक तथा शिल्प निदेशक सुनील नाईकवाडी यांनी आपले विचार मांडले. त्यांनी कारगील युद्धाची पार्श्वभूमी व इतिहास विशद केला. तसेच आपल्या सैनिकी जीवनातील अनेक महत्वाचे अनुभव कथन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य शेख सर यांनी केला. आपल्या देशाचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी देशाचे सैनिक प्राणपणाने लढतात. त्यांचा त्याग आणि बलीदान कायम वंदनीय आहे. आपण आपल्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनातील प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी नेहमी सज्ज असावे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिल्प निदेशिका चक्रवर्ती खिल्लारे यांनी केले. प्रास्ताविक गटनिदेशक जगदिश चौथमल यांनी केले. तर शिल्प निदेशक जानकीराम राठोड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक रामप्रसाद टेकाळे , श्रीकिसन गायकवाड , विजय फदाट , भाऊसाहेब वाकेकर , गजानन लांबे , अमोल गावंडे , अमोल दळवी , सचिन राऊत तसेच शिल्प निदेशिका चित्रा पेंढारकर आदींनी विशेष प्रयत्न केले.
Social Plugin