प्रतिनिधी महेश साखरे 26 जुलै
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 26 जुलै रोजी साखरवाडी या गावांमध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये 66 हजार लक्ष्मीतरु या झाडाचे रोपण करण्याचे अभियान फलटण कोरेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते लक्ष्मीतरु या रोपणाचा अभियान झाले.
फलटण तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याकरता येणाऱ्या काळात फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतर्फे वृक्षारोपण करू आणि तालुक्याला सुजलाम सुफलाम करू असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सातारा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाळासाहेब सोळसकर, महानंद चे उपाध्यक्ष डी के पवार साहेब, साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, महाराष्ट्र राज्य वृक्ष लागवड व संगोपन चे अध्यक्ष प्रभाकर जगताप राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सौ प्रतिभाताई शिंदे, आर्ट ऑफ लिविंग चे माधवराव पोळ, साखरवाडी चे माजी सरपंच विक्रम भोसले, साखरवाडी शाळेचे मुख्याध्यापिका सौ जगदाळे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
Social Plugin