प्रतिनिधी - जावेद अहेमद
बिलोली शहराचा व्हावा तेवढा विकास झाला नाही, आजही लोकांना काम नाही, कामासाठी तेलंगणा येथे मंजुरी ला जावे लागते.आज ही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चांगले रस्ते नाही,नाली नाही अनेक ठिकाणी विंधन विहिर ची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधी लक्ष देतील का? अतिक्रमण धारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरातील भास्कर नगर, देशमुख नगर (इंदिरा आवास) येथे शासनाच्या गायरान जमिनीवर ३० ते ३५ वर्षापूर्वी हातावरील पोट असलेल्या निराधार ,भुमिहिन व्यक्तींनी घरे बांधली आहेत.त्यामुळे त्यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण केलेली जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र या कडे तहसीलदार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हात तीन खासदार, तालुक्याला आमदार असुन सुद्धा, गोरगरीब अतिक्रमण धारकांकडे दुर्लक्ष होत आहे . हा प्रश्न कधी सुटणार असे नागरिकांना कडून बोलले जात आहे.स्थानिकांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे निवेदन देऊन भोकर प्रमाणे आम्हाला घरकुल साठी जागा आमच्या नावे करावे अशी मागणी केली होती .लवकरात लवकर गावरान जागा नावे करून तात्काळ घरकुल देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे या वेळी इंद्रजित तुडमे, सय्यद रियाज, शेख पाशा, सह अनेक जन उपस्थित होते
Social Plugin