संजय भरदुक वाशिम जिल्हा प्रतिनिधी
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या 97 स्थापना दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र वाशिम विधाता प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातील प्रगतशील महिला कृषी उद्योजक शेतकरी यांचा सन्मान सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आर. एल. काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र वाशिम प्रमुख अतिथी आरिफ शाहा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी विभाग वाशिम श्रीमती अनिसा महाबळे प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय वाशिम श्री सुधीर खुजे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमेद प्रकल्प वाशिम सौ.शुभांगी वाटाणे गृह विज्ञान विभाग कृषी विज्ञान केंद्र वाशिम तसेच डॉ. एस के देशमुख विषय तज्ञ कृषी विस्तार कृषी विज्ञान केंद्र वाशिम . तसेच नैसर्गिक शेती कक्ष प्रमुख मोरे साहेब आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सौ.भाग्यश्री गायकवाड यांना सन्मानपत्र शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ.भाग्यश्री गायकवाड यांनी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनात ग्राम गायवळ येथे डॉ.पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची स्थापना करून परिसरातील शेतकऱ्यांना तसेच जिल्हा बाहेरील शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा अल्पशा घरामध्ये उपलब्ध करून देत आहेत याकरिता त्यांना कृषी विज्ञान केंद्र करडा येथील संपूर्ण शास्त्रज्ञाच्या टीमचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते तसेच कृषी विभाग कारंजा येथील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याबाबत भाग्यश्री गायकवाड यांनी सांगितले सौ भाग्यश्री गायकवाड यांची कृषी विस्तार मधील कार्य जैविक निविष्ठा निर्मिती केंद्राच्या मार्फत जिल्ह्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यातून शेतकऱ्यांना निविष्ठाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे याकरिता कृषी उद्योजक म्हणून प्रकल्प संचालक आत्मा वाशिम श्रीमती अनिसा महाबळे यांच्या हस्ते सौभाग्य श्री गायकवाड यांचा आज सन्मान करण्यात आला.
Social Plugin