ग्रामीण प्रतिनिधी/प्रसाद दिनकरराव :
विधानभवनामध्ये गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती या अनुषंगाने बदलापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात त्यांच्या प्रतिमेला दूध अभिषेक घालण्यात आला असून या घटनेचा निषेध केला तसेच विधान भवनात सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाचे कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा कट रचला होता, असे गुन्हेगार विधानभवनात येतातच कसे ?
भाजपाच्या सत्तेच्या काळात असे प्रकार होणे हे राज्याच्या राजकिय संस्कृती पातळी खाली गेल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गटाकडून करण्यात आलाआमदार डॉ जितेंद्र आव्हाडाच्या वर गेली काही दिवस पासून शाब्दिक, मानसिक हल्ले सुरू आहेत छत्रपती शिवाजीराजे, शाहू महाराज, फुले आणि आंबेडकर ह्यांच्या विचारावर चाललेल्या पुरोगामी विचार वर घाला घालण्याचे काम राज्य सरकारने घातला आहे ,गृहमंत्री करतात काय हा प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडला आहे व
पुरोगामी विचार जिवंत ठेवण्याचे काम आमदार डॉ जितेंद्र आव्हाड माध्यामातून राज्यात होत असताना त्यांच्या वर हल्ले होत आहेत हे आम्ही कदापि सहन करणार नाही
पुरोगामी विचार जिवंत ठेवायला पाहिजेत हाच दृष्टिकोन ठेऊन आज डॉ आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांचा पंचाअमृत दुग्धभिषेक केल्याचे मत अविनाश देशमुख यांनी व्यक्त केला
Social Plugin