Ticker

6/recent/ticker-posts

रुद्रा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स मालकाचे जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड येथे आमरण उपोषण,



(  ज्ञानेश्वर ठोके @ ग्रामीण प्रतिनिधी)

रुद्रा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स मार्फत प्रशासकीय कार्यालय भारतीय स्टेट बँक शिवाजी नगर नांदेड, कार्यालयाला कार कंत्राट द्वारे सेवा देण्यात आली, दिनांक 01/07/2022 रोजी दोन्ही पक्षांच्या अंतर्गत नियम व शर्तीचे पालन काटकसरीने करून कार करार करण्यात आला होता. दिनांक 17/07/2023 रोजी प्रशासकीय कार्यालय मार्फत दूरध्वनी द्वारे रुद्रा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स च्या मालकाला संपर्क करून कार नको असे , मानव संसाधन अधिकारी प्रशासकीय कार्यालयाकडून सांगण्यात आले,

या मुळे रुद्रा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स ला खूप मोठा फटका बसला आहे, रुद्रा टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स ला न्याय मिळावा म्हणून चे मालक हे अंदाजे 3 महिन्या पासून जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण नास बसले आहेत .