अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड तालुक्यात वर्ष २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बांधीत शेतकऱ्यांना संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुदान मंजूर करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही त्यांच्या याद्या तहसील कार्यालयात सादर करण्याचे निर्देश तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिले आहेत. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले,की आजपर्यंत ग्राम महसूल अधिकारी यांनी सजातील खातेदार यांच्या याद्या अपलोड करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या आहे.
परंतु अनेक सजेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित अथवा अनुदान याद्या अपलोड करण्यासाठी सादर केले नाहीत,अशा लाभार्थीच्या याद्या येत्या १५ जुलै पर्यंत विनाविलंब कार्यालयास सादर कराव्यात.जेणे करुन सदर लाभार्थी याच्या अनुदान याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करुन लाभार्थी यांना अनुदान वितरण करण्यात येईल.यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी शिल्लक राहीलेले लाभार्थी यांच्या याद्या लिहुन मुदतीत सादर न केल्यास आपल्या सजेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित राहीले नाहीत असे गृहीत धरुन अनुदान वाटपाचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल,असे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले.
Social Plugin