Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघात अॅड. शिवानंद टेकवाड यांची सदस्यपदी निवड.



देगलूर - प्रतिनिधी- जावेद अहेमद

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघाच्या निवडणुकीत अॅड. शिवानंद टेकवाड तमलूरकर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला असून, वकिली क्षेत्रातल्या त्यांच्या लोकप्रियतेला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. नव्या पिढीतील उमदे नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अॅड. शिवानंद टेकवाड तमलूरकर यांनी १२६८ पैकी तब्बल 905 मते मिळवून सदस्यपदी निवडून आले आहेत . 

या घवघवीत यशामागे त्यांचे सातत्याने ठेवलेले जनसंपर्क, समाजातील सर्व समाजातील घटकासाठी केलेले कार्य आणि कायद्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय मिळवून देण्याची तळमळ हे प्रमुख कारण आहे. त्यांच्या विजयाने वकिलांमध्ये तरुण नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा अधोरेखित केला आहे.या निवडणुकीतील त्यांच्या विजयामागे फक्त मतांचे संख्यात्मक मताधिक्य नाही, तर त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आहे. त्यांनी आजवर गरीब, वंचित, शोषित घटकांसाठी लढा दिला आणि प्रामाणिकपणे समाजापर्यंत पोहोचण्याचं काम केले आहेत वकील संघातील मतदारांनी त्यांच्या याच भूमिकेला दाद दिली आहे.

विशेष म्हणजे कमी वय असूनही त्यांनी हे मोठं यश मिळवलं. त्यांनी हा विजय स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गुरुजन, सहकारी मित्र आणि संपूर्ण वकिल बांधवांना अर्पण केला आहे. त्यांच्या नम्र स्वभावामुळेही त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला आहे.व त्यांनी उच्च न्यायालय स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यांनी नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरुजनांना व सहकारी वकील मित्रांना दिलं आहे. या मुळे त्यांच्यावर अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

*विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “ही निवड माझ्यासाठी केवळ प्रतिष्ठेची बाब नाही, तर वकील संघासाठी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आहे. हा विजय माझा नाही, तर माझ्या सहकाऱ्यांचा आणि माझ्या गुरुजनांचा आहे.” त्यांच्या या वक्तव्यातून त्यांची नम्रता आणि संघभावना ठळकपणे दिसून आली.*-अॅड.शिवानंद टेकवाड 

सदस्य वकील संघ मुंबई उच्च न्यायालय खांडपीठ औरंगाबाद.