Ticker

6/recent/ticker-posts

मालेगाव येथे शंभर रुपये किंमतीचे स्टॅम्प उपलब्ध करून देण्याची मागणी : जावेद धनु भवानीवाले (सामाजिक कार्यकर्ते)



     मालेगाव:दि:05/07/2025 मालेगाव शहरामध्ये शंभर रुपये किंमतीच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा  जाणवत असल्याने परिसरतील घरकुल पात्र लाभार्थी,शालेय विद्यार्थी,शेतकरीवर्ग, खरीदी- विक्री करणाऱ्या नागरिकांना शंभर रुपयाच्या स्टॅमच्या ऐवजी पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेणे भाग पडत आहे.परिणामी नागरिकांना आर्थिक भृदंड सहन करावी लागत असल्याकारणामुळे पालकवर्ग, शेतकरी, व सामान्य नागरिक चिंतेत आहेत. या महत्त्वाच्या बाबीकडे संबंधीत महसुल विभागाने आपले लक्ष केंद्रित करून नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्याच्या उद्देशाने तात्काळ शंभर रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले यांनी केली आहे.

     कारण मालेगाव येथील तहसीलमध्ये व शहरात दोनच ठिकाणी स्टॅम्प पेपर विक्रेते असून मागील काही दिवसापासून शंभर रुपयाचा स्टॅम्प उपलब्ध नसल्याकारणाने नागरिकांना विनाकारण मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी देखील या महत्वाच्या बाबी कडे लक्ष देणे गरजेचे आहे