Ticker

6/recent/ticker-posts

मदतनीस,अंगणवाडी सेविका नेमणुकीस विलंब



राजपाल बनसोड  प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस : येथील प्रकल्पातंर्गत कार्यक्षेत्रातील रिक्त पद मंजूर अंगणवाडीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती राबवून महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. परंतु अद्यापही नेमणूक करण्यास विलंब होत आहे. यामुळे दिग्रस एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अंगणवाडी सेविकेच्या ६ तर मदतनीस पदाच्या ११, अशा एकूण १७जागांसाठी तब्बल १४२ अर्ज बालविकास प्रकल्पाला प्राप्त झाले. या अर्जाची छाननी करून अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनिसपदाची प्राथमिक गुणवत्ता यादी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प दिग्रस या कार्यालयामार्फत १७ एप्रिल रोजी प्रसिध्द्ध करण्यात आली. अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस या मानधनीपदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून या कार्यालयामार्फत अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनिस या पदासाठी पात्र, अपात्र उमेदवाराची प्राथमिक गुणवत्ता १७ एप्रिल रोजी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली होती. यादिमध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील अर्ज केलेल्या उमेदवाराची नावे त्यांनी धारण शैक्षणिक अर्हर्तेनुसार व गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या गुणानुक्रमानुसार अतिरिक्त गुणनुक्रमानुसार दर्शविण्यात आलेली होती. त्यानंतर यादीतील कोणत्याही उमेदवारास मिळालेल्या गुणाबाबत डोळंबा, कलगाव,मोरखेड, ईसापूर, झीरपूरवाडी या गावातील अर्जावर तक्रार असल्याची माहिती विभागाच्या कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे. 

या गावातील सेविकापद रिक्त असून या पदभरतीसाठी होत असलेल्या विलंबामुळे त्या गावातील बालकांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. फक्त मदतनीस यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येतो त्यामुळे या राबविलेल्या प्रक्रिया सर्व निकष लावून राबविण्यात आल्यानंतर तक्रारीचा प्रश्नच उद्भवत नसल्याने पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, अशी पात्र उमेदवारांकडून मागणी होत आहे.

( दिग्रस येथील प्रकार  एकात्मिक बाल विकास कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह )