Ticker

6/recent/ticker-posts

ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय राजस्थान च्या वतीने महाराष्ट्र दिव्यांग समानता, संरक्षण आणि सक्षमीकरण मोहीम राबवली



प्रतिनिधी --संजय भरदुक मंगरुळपीर

मंगरुळपीर--ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थान व महाराष्ट्र शासनाच्या वतीने व मंगरुळपीर येथील ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय सेंटर च्या संचालिका सारिका दिदी व गौरी दिदी तसेच माउंट अबू राजस्थान येथून आलेले भाई यांनी सतीमाता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुकबधीर व दिव्यांग निवासी विद्यालय तुळजापूर, मंगरुळपीर चित्रॠॄषी महाराज वॄध्दाश्रम वरुड मंगरुळपीर येथे महाराष्ट्र दिव्यांग समानता, संरक्षण आणि सक्षमीकरण मोहीम चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दिव्यांग अपंग व वॄध्दसेवा हिच ईश्वर सेवा या भावनेने आत्म्यास आनंद फुलत बहरत असतो.विविध प्रकारच्या हस्तकला मुलांना शाळेत करून दाखविले मुलांना वेगळाच अनुभव व आनंद दिसत होता आध्यात्मिक ज्ञान चा विकास होत होता.तनावमुक्त जीवन, मानसिक शांती, पारिवारिक जीवनातील आनंद कसा घ्यावा यासाठी ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय कशाप्रकारे आध्यात्मिक ज्ञान दिले जाते यांचे सविस्तर असे सखोल मार्गदर्शन केले व जनजागृती मोहीम राबवली तसेच मुलांना काही गिफ्ट व आध्यात्मिक पुस्तके भेट दिली.यावेळी माउंट अबू राजस्थान येथील भाई व दिदी. तसेच मंगरुळपीर सेंटर च्या सारिका दिदी, इंगोले ताई, देशमुख भाई, जयपाल भाई, राठोड भाई, अभिजित राठोड सर, अनिल चव्हाण सर,व इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी व उपस्थित होते.