पालघर (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
हिंदू धर्मात शंकर म्हणजे शिवाचे महत्व असामान्य आहे.श्रावण महिना चालू झाला की कावडिया हरिद्वार येथे गंगाजल घेऊन शिव पिंडीवर अर्पण करीत असतात उत्तर प्रदेश येथे चालू असलेला हा सण हळूहळू पूर्ण भारत भर पसरत आहे . उत्तर भारतीय जेथे तेथे असतील तेथे हा सण साजरा करीत असतात. आज पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDC येथे कंपनी मध्ये काम करणारे उत्तर भारतीय कामगार बोईसर ते संजाण येथे असलेल्या शिव मंदिर सुमारे ७० किलोमीटर चालत जाऊन कावड घेऊन मंदिरात जाऊन जलाभिषेक करतात. आज सकाळीच सर्व भक्तगण कावड घेऊन मार्गस्थ झाले. त्यांच्या साठी ठीक ठिकाणी चहा नाश्त्याची आणि जेवणाची सोय केली गेली आहे.हिंदू परंपरा जपण्यात उत्तर भारतीय नेहमीच पुढे असतात. धर्म टिकवण्यासाठी परंपरा जपणे ही खूप महत्वाचे असते
Social Plugin