*लोखंडी रॉडने मारहाण,पोटात धारदार शस्त्राने वार करून संपवलं,पाच संशयित आरोपींविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...*
अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
जालन्यात जुन्या वादातून एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला आहे.जालन्यातील घनसांवगी तालुक्यातील बोधलापुरी गावामध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. संभाजी उंडे वय 27 वर्ष असं मयत तरुणाचं नाव आहे.आज सकाळच्या सुमारास गावात या तरुणासह त्याच्या आईवडिलांना पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.या मारहानी दरम्यान संभाजी उंडे या तरुणाच्या डोक्यात आणि पोटावर चाकूने वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला होता.ग्रामस्थांनी या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल आहे.दरम्यान शवविच्छेदनासाठी या तरुणाचा मृतदेह घनसावंगी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे. याप्रकरणी जालन्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यात संशयित पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे..
Social Plugin