सेवागिरी विद्यालयासाठी ५१ हजारांची देणगी
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे]
शैक्षणिक गुणवत्तेबाबत आघाडीवर असलेल्या पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सेवागिरी विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम जोमात सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी या विद्यालयातील माजी विद्यार्थी शंतनू प्रल्हाद वाघ-पाटील यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली.माजी विद्यार्थी या नात्याने कर्तव्य म्हणून इमारतीच्या बांधकामासाठी मदत केली आहे. यापुढेही विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन श्री. वाघ यांनी दिले.
दरम्यान, विद्यालयाचा कायापालट व नावलौकिक वाढविण्यासाठी येथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत उच्चपदावर काम करत असलेल्या माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी देगणी स्वरूपात मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. सर्वांच्या मदतीतून लवकरच सुविधांयुक्त सुसज्ज इमारत उभी राहील, असे मत मुख्याध्यापक ए . बी . सावंत व शिक्षकांनी व्यक्त केले.
Social Plugin