Ticker

6/recent/ticker-posts

डीजी कॉलेजच्या राहुलची बँकिंग भरती परीक्षेत हॅट्रिक

 


 

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]  रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी बँकिंग भरती परीक्षा व इतर भरती परीक्षेत विशेष यश संपादित केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाममात्र की मध्ये बँकिंग भरती परीक्षेचे प्रशिक्षण देण्याकरिता महाविद्यालयात 2013 पासून बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जात असून या केंद्राद्वारे बँक प्रोफेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग असिस्टंट क्लर्क तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध भरती परीक्षेची तयारी करून घेतली जाते या केंद्रात सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून युवक युती भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात.  या विद्यार्थ्यांना भरती परीक्षेच्या मार्गदर्शनाबरोबरच  सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

केंद्रातील एक गरीब व होतकरू विद्यार्थी राहुल मोरझकर हा मौजे उसप ता. दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथून आपल्या भविष्याच्या शोधात डी. जी. कॉलेजच्या बँकिंग स्पर्धा परीक्षा केंद्रात तयारी करीत होता त्याला घवघवीत यश मिळाले असून त्याची एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पदावर निवड झाली आहे. राहुलची सद्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर असोसिएट, भारत सरकारच्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये बँकिंग असोसिएट या पदावर निवड झालेली आहे. राहुल सोबतच या केंद्रातील अनिकेत शिंदे यांची आयडीबीआय बँकेत ज्युनियर असोसिएट पदी तर शुभम चव्हाण यांची महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागात रिसर्च असिस्टंट म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. गणेश जाधव, बँकिंग केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार, उप-प्राचार्य प्रो. डॉ. तुळशीराम महानवर, विभागातील प्राध्यापक डॉ. राजशेखर निल्लोलू, डॉ. विजय पाटील, प्रा. रोहिणी भोसले, प्रा. शंकर मोटे, प्रा. बाजीराव नरळे, अधीक्षक श्री. अशोक मसने आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदण केले व शुभेच्छा दिल्या.