Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी एकादशी निमित्त मोफत तुळशी वाटप



कैलास कोल्हे@ग्रामीण प्रतिनिधी 

संभाजीनगर: वीकॅन एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि हर्ष ऍग्रो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूर येथे 'मोफत वृक्ष' वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. रविवारी वाळूज पंढरपूर येथील ए. एस. क्लब उड्डाणपुलाखाली जवळपास चारशे रोपे भाविकांना मोफत दिली.

यात प्रामुख्याने तुळस, पिंपळ, कढीपत्ता आणि बेल यांसारख्या देशी वृक्षांचा यात समावेश आहे. 'झाडे लावा, त्याचे संगोपन करा अन् प्रदूषण टाळा' हा संदेश देण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वारकऱ्यांनी ही रोपे घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी सर्व झाडे हर्ष ऍग्रो केअर यांच्या मार्फत पुरवण्यात आली.

या कार्यक्रमासाठी लक्ष्मण हिवाळे,दिलीप शिखरे, अमोल गवई,सरिता गोरे, मनीषा मते, फाल्गुनी ठाकूर, आश्विनी गवई,कानिफनाथ कादे , हरिकेश मोरे,सूरज माने, सम्यक त्रिभुवन, अक्षय कोलगुडे आदींची या वेळी उपस्थिती होती.