Ticker

6/recent/ticker-posts

कटचिंचोली.जि.प.प्रा शाळेची मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी निमित्त गावात दिंडीची मिरवणूक.



तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई 

गेवराई(बीड):-गेवराई तालुक्यातील कटचिंचोली.जि.प.प्रा शाळेची मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी निमित्त गावात दिंडीची मिरवणूक. दि.05/07/2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटचिंचोली केंद्र - रेवकी ,शाळा कटचिंचोली शाळेमध्ये  सर्व मुलांनी वेशभूषा करून मुलांची वारी गावामध्ये काढण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी पांडुरंग व रुक्मिणी तसेच वारकरी यांची वेशभूषा साकारली होती.सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.वारी मध्ये विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  वारीची सुरुवात शाळेमधून सुरू होऊन गावामधून फिरून गंगेच्या तिला वरती गोदाकाठी विठ्ठल, रखुमाई मंदिरामध्ये  गेली.तेथे सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदानी फुगडी खेळली ,नाचले गायले ,नंतर त्यांना गावकऱ्यांतर्फे खाऊ वाटप करण्यात आला. नंतर शाळेमध्ये वारी परत येऊन तेथे त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

अशा प्रकारे वारी ची सांगता करण्यात आली.या वारीला  सर्व गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.