मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव:मालेगाव शहरातील पोलीस स्टेशन समोरील माऊली हॉटेल येथे सर्पमित्र प्रेमींची एक अनोखी धावती भेट रंगली या प्रसंगी सर्पमित्र रील स्टार पूजा बांगर व त्यांच्यासोबत हिंगोलीचे जिद्दी सर्पमित्र विजयराज पाटील,औंढा नागनाथ येथील मुख्य पुजारी नागेश महाराज, तसेच कीर्ती, क्षीरसागर, कुशाग्र वेणीकर, बाळू डोके, शाहरुख पठाण, यांचा मालेगांव तालुक्यातील सर्व सर्पमित्रांनी उत्स्फूर्त स्वागत केले व शाल,श्रीफळ व आणि पुष्पगुच्छ देऊन केलेल्या या सन्मान सोहळ्यात मालेगाव तालुक्यातील सर्व सर्पमित्रांनी विशेष कौतुक व्यक्त केले.
विजयराज पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट मुंबईत जाऊन वारंवार विनंती केली होती त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत, अखेर सर्पमित्र प्रेमींसाठी 10 ते16 लाख रुपयांचा विमा व शासनाचे ओळखपत्र व अति आवश्यक सेवा आणि योजना मिळवून देण्यात आली ही योजना सर्पमित्रांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा टप्पा ठरली आहे व तसेच एम एस ई बी कर्मचारी सर्पमित्र जितू खंडागळे,यांनी स्टीक भेट दिली.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता सुनील श्रीराम शर्मा, पत्रकार प्रदीप सावले, सामाजिक कार्यकर्ते अजय घुगे यांसह मालेगाव तालुक्यातील असंख्य सर्पमित्र प्रेमी उपस्थित होते.
सर्वांनी विजयराज पाटील यांच्या या कार्याचे मनापासून अभिनंदन करत भविष्यातही अशाच जिद्दीने सर्पमित्रांच्या हक्कासाठी लढा द्यावा,अशा शुभेच्छा दिल्या हा सन्मान सोहळा केवळ भेटीपुरता मर्यादित न राहता,सर्पमित्र चळवळीला बळ देणारा ठरला सर्पमित्रांसाठी विमा योजना मिळवून देण्यामागील ही यशोगाथा मालेगावाच्या सामाजिक इतिहासात नोंदली जाईल यात शंका नाही.





Social Plugin