Ticker

6/recent/ticker-posts

गणेशोत्सवात डीजेला बंदी ; पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा!-पोलीस निरीक्षक संजय चौधरी



प्रतिनिधी: - जावेद धन्नू भवानीवाले

     गणेशोत्सवात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे वापरण्यास सक्त मनाई असून फक्त पारंपरिक वाद्यांचा वापर करावा,अशा सूचना मालेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय चौधरी यांनी दिल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या नियमांचे पालन अनिवार्य आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की,गणेशोत्सव काळात जुगार खेळणे,मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे,तसेच कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही असे प्रकार आढळल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल.

    गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी खालील बाबींचे काटेकोर पालन करावे,अशा सूचना चौधरी यांनी दिल्या आहेत ध्वनिप्रदूषण होणार नाही याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी,गुलालाचा वापर फक्त पूजा विधीसाठी मर्यादित स्वरूपात करावा,गणपती उत्सवासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे,वर्गणी जमा करताना कोणावरही जबरदस्ती करू नये,वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी मूर्ती स्थापना करू नये,मंडळांनी विजेचे अधिकृत कनेक्शन घ्यावे,रात्रीच्या वेळी मंडपावर लक्ष ठेवण्यासाठी सदस्यांची नेमणूक करावी,मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत तसेच,डीजेवर संपूर्ण बंदी असून,जर कुठे डीजे गाणी किंवा प्रचंड आवाज ऐकू आला तर कोणालाही वाचवले जाणार नाही,थेट दंडात्मक तसेच ध्वनी प्रदुषण नियंत्रण कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक संजय चौधरी यांनी दिला आहे. या सूचना काटेकोरपणे पाळून प्रशासनाला सहकार्य करावे गणेशोत्सव शांतता,सौहार्द आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.