Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ. शिवाजीराव चोथे यांचा शिवसेना उबाटा गटाला राम राम




अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 शिवाजी चोथे मागील ४० वर्षे शिवसेनेत विविध पदांवर काम केले आणि त्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक काम केले.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आपला स्नेह आणि प्रेम नेहमीच या काळात माझ्या पाठीशी राहीले.त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.काही वैयक्तिक कारणांमुळे मी आज माझ्या शिवसेना सहसंपर्क प्रमुख पद व शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्या कडे नम्रपणे देत आहे.माझ्या आजपर्यंतच्या संपूर्ण राजकीय त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीत आपली साथ मला नेहमीच राहात आलेली आहे.मी पक्षाचा राजीनामा जरी देत असलो तरी माझ्या हृदयात स्व.बाळासाहेबजी ठाकरे,आपण आणि मातोश्री बद्दल कायम स्नेह राहिल तसेच शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाची भावना यापुढेही पूर्वीप्रमाणेच राहील..