कंधार येथील प्रसिद्ध सूफी संत हजरत सय्यद शाह शेख अली सांगडे सुलतान मुशकिल आसान रह. यांच्या ५५२व्या उर्सास रविवार, ३ ऑगस्टपासून भव्य प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उर्स महोत्सवात विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हिंदू-मुस्लीम भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
प्रेम, शांतता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या पवित्र स्थळावर दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. दि. ३ ऑगस्ट रोजी संदल मिरवणूक, ४ ऑगस्ट रोजी फातहा व धार्मिक प्रवचन, तर ५ ऑगस्ट रोजी संगीतमय फातहावाचनाचा समारोप सोहळा होणार आहे.
सर्व भाविकांनी उपस्थित राहून सूफी परंपरेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Social Plugin