Ticker

6/recent/ticker-posts

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधात तालुका हिमायतनगर मोजे शिरपल्ली येथील शेतकरी आक्रमक



"जीव गेला तरी चालेल पण जमीन जाऊ देणार नाहीं" अशी शेतकऱ्यांची भूमिका 


हिमायतनगर  प्रतिनिधि:- उत्तम पाईकराव,

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला आता हिमायतनगर तालुक्यातील मोजे शिरपली इथे आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 20 गावाच्या शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार समुदायासमोर शिरपल्ली येथे होणाऱ्या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला निम्म पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ व मराठवाडाचे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील प्रसिद्धी प्रमुख तथा संघटन सचिव निम्मा पैनगंगा धरण संघर्ष समिती मुबारक तवर व आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती तथा सचिव विजय पाटील राऊत यांच्या प्रमुख उपस्थित तीव्र विरोध केला आहे.

 महाराष्ट्र केंद्र शासनाकडून हिमायतनगर , उमरखेड, किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर 7000 कोटी रुपयाच्या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मान्यता मिळाल्याचे समजताच हिमायतनगर तालुक्यातील 15 ते 20 गावाच्या शेतकऱ्यांनी या विविध प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाच्या धोरणाविषयी असंख्य विषयावर चर्चा व्हावी या विचाराने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संयुक्त सभा क्रांतीदिनी म्हणजे दिनांक 9 ऑगस्ट रोजी हिमायतनगर तालुक्यातील मोजे शिरपल्ली येथे आयोजित केली होती. 

या सभेला मार्गदर्शन करताना शेतकरी नेते तथा निम्म पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ व मराठवाड्याचे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन करून" लढेंगे भाई ,लढेंगे और जितेंगे ,जान देंगे पर  जमीन नही देंगे,  आसे नारे देत. शेतकरी आंदोलन आगामी काळातील प्रकल्पाला कडाडून विरोध केला. त्यामुळे या भागातील हजारो शेतकरी सुद्धा आता आक्रमक झाले आहेत .या प्रकल्पामध्ये हिमायतनगर तालुक्यातील एक हजार हेक्टर जमीन व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 35 ते 40 गावातील सुपीक जमीन जाणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सहस्त्रकुंड  प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा. अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आज नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली येथे हजारो शेतकऱ्यांनी महा एल्गार सभा घेऊन तीव्र विरोधी  दर्शविला आहे.