Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस च्या एका दणक्यात ऑनलाईन सुरू कामगारांचा हक्काचा किट साठी माजी आ. राहुल भाऊ बोन्द्रे आक्रमक!!



मन्सूर शहा धोत्रा.भनगोजी.

 प्राप्त माहितीनुसार चिखली MIDC येथील खाजगी गोडाऊनमध्ये कामगार कल्याण विभागामार्फत कामगारांना पेट्या वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील शेकडो कामगारांना आजची तारीख देऊन बोलावण्यात आले, परंतु प्रत्यक्षात तिथं कोणतीही तयारी नव्हती. साधा शिपाईसुद्धा उपस्थित नव्हता आणि संबंधित ठेकेदार व कर्मचारी फोनही उचलत नव्हते. त्यामुळे कामगारांना प्रचंड गैरसोय झाली.ही बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी व माझे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालो. 

विभागाचे मंत्री मा. आकाश भाऊ फुंडकर तसेच मुंबई येथील सचिवांशी थेट संपर्क साधून समस्या सोडविण्याची मागणी केली.मी उपस्थित कामगारांना आश्वस्त केले की त्यांचे काम लवकरच मार्गी लागेल. आणि खरंच, मी घरी पोहोचत नाही तोच काही कामगारांचा फोन आला की –“भाऊ, तुम्ही आमच्यासाठी आवाज उठवला, आमच्या समस्या मांडल्या आणि तुमच्यामुळे दहा दिवसांनी सुरू होणारा वाटप व ऑनलाईन साईट लगेच सुरू झाला आहे!”यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार राहुल भाऊ बोन्द्रे शहराध्यक्ष राहुल सवडतकर, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव,युवक शहराध्यक्ष रिकी काकडे, युवक तालुकाध्यक्ष अंबादास वाघमारे,सतीश शिंदे, खविस अध्यक्ष ईश्वरराव इंगळे व इतर साहकरी उपस्थित होते.कामगारांच्या हक्कासाठी नेहमीच लढत राहणार!!