किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी सकाळी बैलांना धुवून वेगवेगळ्या रंगांनी सजवले बैलांच्या शिंगाना घागर मळा, फुलाचे हार ,झुला व झगमगती सजावट करण्यात आली .काही ठिकाणी बैलांच्या अंगावर वेगवेगळे संदेश लिहिण्यात आले. यावेळी प्रत्येक घरात बैलांचे पूजन करण्यात आले व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला .
शेतकरी बांधवांनी या दिवशी बैलांना जेवण घालून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली 365 दिवस काम करणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण असतो. शेती संस्कृतीला अधोरेखित करणारा आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याशी घट्ट नाळ जोडणारा हा सण आनंद, आपुलकी आणि उत्साहाचे प्रतीक आहे.अशाप्रकारे अंतुर्ली येथे बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला.
Social Plugin