Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी विद्यार्थ्यांना "ज्यूस वाटप कार्यक्रम"मोठ्या उत्साहात संपन्न..!



कैलासराजे घरत खारपाडा पेण 

सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिता पटोले मॅडम यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम."घे उंच भरारी सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांना "ज्यूस वाटप कार्यक्रम"मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या वडमाळवाडी, खैरासवाडी प्राथमिक शाळेतील गरीब आणि गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना ज्यूस पॅकेटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. वडमाळवाडी, खैरासवाडी या दोन शाळांमध्ये ज्यूस वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची आवड आहे परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज भागवून त्यांच्या शिक्षणात सातत्य रहावे. शिक्षण हेच भविष्य घडविते आणि असे मदतीचे हातच समाजाला सक्षम बनवत असतात. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वह्या, पेन्सिल, पेन, पॅड, रेनकोट वाटप, छत्री वाटप, कपडे वाटप, खाऊ वाटप असे अनेक शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवित असतो असे सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिता पटोले मॅडम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले त्या म्हणाल्या आम्ही मराठी शाळेत शिकलो.आज शहरात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत आहेत. पण आपल्यासारखे शिक्षक आज मराठी माध्यमांच्या शाळेत मुलांना मराठी शिकवत आहेत. एवढ्या दुर्गम भागात आपण ज्ञानार्जनाचे उत्कृष्ठ कार्य करत मराठीपण जपत आहात. आम्हाला जेवढे काही शक्य आहे ते आम्ही नक्कीच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी देण्याचा प्रयत्न करू.

आपल्या प्रास्ताविक भाषणात पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष पत्रकार कैलासराजे घरत यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. मुलांनो शिका, खूप मोठे व्हा. तुमचे, आईवडिलांचे, शिक्षकांचे, गावाचे नाव रोशन करा. शिक्षकांनी सांगितलेले ऐका. तुम्ही या भारत देशाचे उद्याचे भावी नागरिक बनणार आहात. उद्या तुमच्यापैकी कोणी आयपीएस अधिकारी, पायलट, जिल्हाधिकारी, डॉक्टर,वकील इंजिनीयर बनेल फक्त एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत जा, यश निश्चित मिळेल. शाळेत शिक्षक आपल्यावर योग्य संस्कार करत असतात. ते संस्कार विद्यार्थ्यांचा भावी काळ ठरवीत असतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अनिता पटोले मॅडम होत्या. त्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस विजय पुष्पमाला अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ प्रणित अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ.अश्विनी ठाकूर मॅडम होत्या त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. श्री पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पुरोगामी पत्रकार संघ पनवेल तालुका संघटक श्री.बाळकृष्ण ठाकूर साहेब, ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडाचे माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रशांत बाळकृष्ण घरत, आमचे मार्गदर्शक श्री.हनुमान बाबू घरत, सामाजिक कार्यकर्ते श्री.अविनाश धनाजी मोकल, घे उंच भरारी सामाजिक संस्थेचे सदस्य जगदीश म्हात्रे, श्री पवार, सतिश गायकवाड, यश घरत, धीरज मालवी, सदस्या सलमा अन्सारी, सलमा खान आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुकाध्यक्ष पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी वडमाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री मंगेश कांबळे सर खैरासवाडी शाळेचे शिक्षक श्री.निशांत नारायण पाटील सर, श्री.अनिल घाडगे सर, अंकुर ट्रस्टच्या सौ.योगिता डंगर मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या स्तुत्य उपक्रमाचे वडमाळवाडी खैरासवाडी आदिवासी बांधवांकडून, खारपाडा पंचक्रोशीतून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.