Ticker

6/recent/ticker-posts

उमरखेडमध्ये शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांची संवाद सभा उत्साहात पार



बाळासाहेब पवार प्रतिनिधी

जिजाऊ भवन, उमरखेड येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा संवाद सभा जल्लोषमय वातावरणात पार पडली. या सभेचे आयोजन शिवसेना नेते, मृद-जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्हा पालकमंत्री आ. संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या सभेला यवतमाळ जिल्हा निरीक्षक व माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख श्रीधर काका मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंतराव पवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ, युवासेना संपर्कप्रमुख विशाल भाऊ गणात्रा, सहसंपर्कप्रमुख चितागरावजी कदम तसेच उपजिल्हाप्रमुख बी. एन. चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बैठकीत उमरखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर राहिले. आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनाची ताकद वाढविणे, प्रत्येक वॉर्ड व गाव पातळीवर संपर्क वाढवणे आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संघटनशक्ती, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनसंपर्काचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारींच्या उपस्थितीमुळे सभेला उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण लाभले.