अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
विद्यार्थ्यानी ज्ञानाच्या मंदीरात प्रवेश केल्यानंतर ज्ञानाचे धडे गिरवण्याबरोबर जीवनात शिस्त, संस्कार,आचार,विचार,देशभक्ती,राष्ट्रप्रेम,सर्वधर्म सहिष्णुता,धर्मनिरपेक्षता यासह आदी नैतिक मूल्यांची जोपासना केल्यास निश्चित जीवनात यश मिळते.शिक्षणातून परिवर्तन घडवत समाजात आदर्श नागरीक बनण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते.असे आवाहन शिक्षक बाबासाहेब गोन्टे यांनी शहरातील मत्स्योदरी विद्यालयात शुक्रवारी संस्कारदिनी बोलताना केले.पुढे बोलताना बाबासाहेब गोन्टे म्हणाले की,प्रत्येकांनी जीवन जगताना नेहमीच सकारात्मक दृष्टीकोण अंगी बाळगायला हवा.यशाचे शिखर गाठायचे असेल तर सतत कार्य मग्नता असायला हवी.विद्यार्थ्यानी आपल्या मनात देशभक्ती,राष्ट्रप्रेम,सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता व आई, वडिल,गुरुजनाविषयी आदरभाव बाळगायला हवा.असे हि शेवटी गोन्टे यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मत्स्योदरी शिक्षण संस्थेत संस्कारदिन,पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी अंकुशराव टोपे यांनी घालून दिलेली शिस्त,संस्कार व मानवी जीवनात नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी.यासाठी माजी आरोग्य मंत्री व संस्थेत अध्यक्ष राजेश टोपे व संस्थेच्या सचिव मनीषाताई टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
Social Plugin